Ad will apear here
Next
‘पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १०३ कोटींची कर्जमाफी’
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १०३ कोटींची कर्जमाफी.पालघर : राज्य सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचा फायदा पालघर जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील १५ हजार ६६६ कर्जबाजारी शेतकऱ्यांना मिळणार आहे. या शेतकऱ्यांची तब्बल १०३ कोटी ६५ लाख रुपयांची कर्जे माफ होणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचे येथील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून, शेतकरी नेत्यांनाही धन्यवाद दिले आहेत.

पालघर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी खरीप किंवा रब्बी कर्ज घेण्यासाठी जिल्हा बँकेचा पर्याय निवडतात. त्यामुळे हे कर्जवाटप इतर बँकांच्या तुलनेत ठाणे जिल्हा सहकारी बँकेमार्फत विविध सेवा सहकारी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वितरित केले जाते.

ठाणे जिल्हा बँकेला या कर्जासाठीचा लक्ष्यांकही मोठा आहे. गेल्या वर्षी ठाणे जिल्हा बँकेकडून वितरीत केलेल्या पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांना १०३ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. यामध्ये ५० हजार ते एक लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या ३७५४ अल्प-भूधारक शेतकर्यांना सुमारे २४ कोटी ६१ लाख रुपये, तर ६६५३ अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना सुमारे ४३ कोटी ७३ लाख रुपये व दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या ५२५९ शेतकऱ्यांना सुमारे ३५ कोटी ३१ लाख रुपये असे सर्व मिळून १५ हजार ६६६ शेतकऱ्यांना १०३ कोटी ६५ लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे.

‘शेतीकर्जाची थकबाकी नेहमीच जास्त राहत असल्याने जिल्हा बँकेचा ताळेबंद अशक्त होता. परंतु राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा एक चांगला निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची कर्जे तर कमी होतीलच, परंतु जिल्हा बँकेचे ताळेबंद सशक्त होणार आहेत,’ अशी प्रतिक्रिया ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांनी व्यक्त केली आहे.

‘शेतकऱ्यांची कर्जमाफी हा शासनाने घेतलेला स्तुत्य निर्णय आहे,’ अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केली.
‘हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आणि त्यांचा विजय आहे,’ अशी प्रतिक्रिया कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZJBBD
Similar Posts
न्यूझीलंडच्या माइक बटलर यांची भारतात ‘दानयात्रा’ मुंबई : आदिवासी भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी न्यूझीलंडमधील ‘दानयात्रे’साठी प्रसिद्ध असणारे माइक बटलर यांनी तीन डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालवधीत मुंबई- पुणे- नाशिक-वाडा अशी ५७० किलोमीटरची दानयात्रा काढली असून, दादरमधील महापौर बंगल्यापासून, सोमवारी, तीन डिसेंबर २०१८ रोजी सकाळी साडे आठ वाजता
कर्जमाफीबाबतच्या तक्रार निवारणासाठी तालुकास्तरीय समिती पुणे : राज्यशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबतीतल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी या समितीकडे संपर्क करावा, असे आवाहन सहकार आयुक्तालयाने केले आहे.
बारा बलुतेदार महासंघाचा भाजपला पाठिंबा मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना बारा बलुतेदार महासंघातर्फे पाठिंबा देण्यात येत आहे, असे महासंघाचे अध्यक्ष नागेश दत्तात्रेय जाधव यांनी गुरुवारी (ता. २४) जाहीर केले.
चक्रीवादळ मुंबईजवळ धडकण्याची शक्यता; अतिदक्षतेचा इशारा मुंबई : अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत अधिक तीव्र झाला आहे. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (दोन जून) सकाळी नऊ वाजता जाहीर केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language